Simar Bhatia : अभिनेता अक्षय कुमारने अनेक हिट चित्रपट बॅालिवूड इंडस्ट्रीला दिले. १५० हून अधिक चित्रपट अक्षयच्या नावे आहेत. आता त्याची भाची सिमर भाटिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून, तिच्या पहिल्या डेब्यू चित्रपटातील लूक समोर आला आहे. ‘इक्कीस’ असे या चित्रपटाचे नाव असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे. चित्रपटातील सिमरचा लूक समोर आल्यानंतर अक्षयने सोशल मीडियावरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. या वर्षात शनाया कपूर, अमन देवगन, इब्राहिम अली खान, राशा थडानी आणि अहान पांडे यांच्यासह अनेक स्टार किड्सनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या स्टार किड्सपैकी काहींचे चित्रपट हिट ठरले, तर काहींना तितक्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहचता आले नाही. आता, वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये, दोन स्टार मोठ्या पडद्यावरून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत. View this post on Instagram A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) त्यापैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चन यांचा मुलगा अगस्त्य नंदा आणि दुसरी म्हणजे बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया. इक्कीस या चित्रपटातून सिमर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लहान मुलीप्रमाणे तुला माझ्या मांडीवर घेण्यापासून ते आज तुला चित्रपटांच्या जगात प्रवेश करताना पाहण्यापर्यंत… आयुष्य खरोखरच पूर्ण वर्तुळात आले आहे, अशी भावना अक्षयने पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. सिमर, मी तुला आईच्या मागे लपून राहणाऱ्या लाजाळू लहान मुलीपासून आज कॅमेऱ्यासमोर अशी आत्मविश्वासू तरुणी बनताना पाहिले आहे जणू तिचा जन्म त्यासाठीच झाला आहे, असेही अक्षयने पोस्टमध्ये म्हटले आहे. अक्षयने पुढे लिहिले, प्रवास निश्चितच कठीण आहे, पण मी तुला ओळखतो, तू त्याच तेजाने, त्याच सत्याने आणि त्याच जिद्दीने पुढे जाशील – जी आमच्या भाटिया कुटुंबाची ओळख आहे. आमचे तत्वज्ञान नेहमीच सोपे राहिले आहे: काम करा, ते मनापासून करा आणि मग विश्वाची जादू कशी घडते ते पहा… माझ्यासाठी तू नेहमीच एक स्टार आहेस, अशा शब्दांत अक्षयने भाची सिमर हिच्याप्रती भावना व्यक्त केल्या आहेत. हेही वाचा : भूकंपाचा ‘या’ देशाला मोठा हादरा, घाबरून लोकं घराबाहेर पळाली ; ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद