Bangladesh – बांगलादेशात एका हिंदू व्यवसायिकाची एकाच कुटुंबातील तिघांनी बेदम मारहाण करून हत्या केली आहे. केळ्यांवरून झालेल्या किरकोळ वादातून गाझीपूर भागात ही मारहाण करण्यात आली होती, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. पण ही हत्या धार्मिक विद्वेषातून झाली आहे का नाही, हे लगेच स्पष्ट होऊ शकलेले नाही. लिटन चंद्र दास असे हत्या झालेल्या हिंदू व्यवसायिकाचे नाव आहे. ते बैसाखी स्वीटमीट ऍन्ड हॉटेल चालवत असत. स्वपन मिया, त्या पत्नी मजेदा खातून आणि त्यांचा मुलगा मासूम मिया यांना या हत्या प्रकरणी प्रमुख संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. मासूम याची केळ्यांची शेती आहे. तेथून केळ्यांचा एक घड गायब झाला होता. शोध घेत असताना त्याला तो घड लिटन यांच्या हॉटेलमध्ये दिसला. वरून लिटन आणि मासूम यांच्यात वादावादी सुरू झाली. मासूम याने लिटन यांना बेदम मारहाण केल्यामुळे लिटन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वेळी मासूम यांचे आई आणि वडील यांनी देखील लिटन यांना मारहाण केल्याचे साक्षीदारांनी सांगितले.