BJP and MIM Alliance | महापालिका निवडणुकीमध्ये एमआयआमने धमाकेदार कामगिरी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमने मोठा विजय मिळवला. मुंबई महापालिकेतही एमआयएमला यश मिळाले. मात्र, विरोधकांकडून एमआयएमला भाजपानेच पाठिंबा दिल्याचे आरोप करण्यात आले. याचदरम्यान आता अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदमध्ये भाजप आणि एमआयएमने युती केली. समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमने एकमेकांना साथ दिली. या युतीमुळे एमआयएमच्या पदरात महत्त्वाचे पदही पडले आहे. युतीमध्ये एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडी समितीचे सभापती पद देखील मिळाले. एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपसोबत गेला. BJP and MIM Alliance | एमआयएम आणि भाजपाची एकमेकांना साथ अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमसोबत (BJP and MIM Alliance) आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एमआयएम आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या विचारधारा पूर्णपणे वेगळ्या आहेत. निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांवर सडकून टीका करत होते. काहीही झालं तरी भाजपसोबत जायचं नाही, अशी भूमिका एमआयएमचे अध्यक्ष असदद्दीन ओवेसी यांनी घेतली होती. असे असतानाही एमआयएम आणि भाजप एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. हेही वाचा: Neha Dhupia: पोट फुगणं आणि पचनाच्या त्रासावर नेहा धुपियाचा घरगुती उपाय; अँटी-ब्लोटिंग ड्रिंकची सोपी रेसिपी