Pathan 2 : बॅालीवडूचा किंग खान अर्थात शाहरुख खान त्याच्या आगामी किंग चित्रपटात व्यस्त आहे. हा चित्रपट शाहरूखचा पुढील वर्षातील मोठा चित्रपट असणार आहे. चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली असून, अभिनेत्याच्या लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच आता शाहरुखच्या दुसऱ्या एका चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट २०२३ च्या सुरुवातीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर धडाकेबाज कमाई केली. या चित्रपटात अभिनेता जॅान अब्राहमने नकारात्मक भूमिका साकारलेली होती. तर अभिनेत्री दीपिका पादुकोणनचा अॅक्शन अवतार पाहून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. आता YRF ने संकेत दिले आहेत की पठाणचा सीक्वल बनवला जाईल. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या ‘पठाण २’ मध्ये मोठ्या कलाकारांचा समावेश असणार आहे. या चित्रपटात YRF गुप्तहेर विश्वात एक नवीन भर पडणार आहे. असे म्हटले जात आहे की, शाहरुख खान आणि ज्युनियर एनटीआर या चित्रपटाच्या माध्यमातून स्क्रीन शेअर करणार आहेत. दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य चोप्राने ‘पठाण २’ साठी ज्युनियर एनटीआरशी बोलले सुरू केले आहे. तो या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसू शकतो. त्यामुळे ज्युनिअर एनटीआर पठाण दोनचा भाग होणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. वॅार २ या चित्रपटातून ज्युनिअर एनटीआरने बॅालीवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्याने हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले, मात्र बिग बजेटवर तयार झालेल्या वॅार २ ने बॅाक्स अॅाफिसवर जशी पाहिजे तशी कमाई केली नाही. हेही वाचा : सुप्रिया सुळे घेणार अमित शाहांची भेट; महापालिका निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग