Anjali Damania : पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सातत्याने आक्रमक भूमिका घेत सनसनाटी आरोप करत आहेत. त्यांनी पुणे जमीन प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. नुकत्याच या प्रकरणावर त्यांनी थेट अजित पवार यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचा २०१८ पासून या जमिनीवर डोळा होता, असे त्या म्हणाल्या आहेत. त्यांच्या या नव्या आरोपामुळे जमीन घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. खरंतर राज्यात खळबळ उडवून देणारे पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण प्रचंड चर्चेत आले. या जमीन प्रकरणी मुख्य सूत्रधार शीतल तेजवानी हिला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून तिची चौकशी सुरू असून, या जमीन प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तेजवानीनंतर या प्रकरणात दुय्यम सहाय्यक निबंधक रविंद्र तारू यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली. अशातच जमीन प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या पक्षाची २०१८ पासून या जमिनीवर नजर होती, सत्तेत आल्यानंतर मुलाच्या नावावर जमीनीची खरेदी करण्याची तयारी अजित पवार यांनी केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच या प्रकरणात त्यांनी तत्कालीन माजी उपमहापौर यांचे नाव घेत त्यांच्यावर देखील बोट ठेवले आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याही चौकशीची मागणी केली आहे. २०१८ मध्ये पॅावर अॅाफ अटर्नी निलेश मगर यांच्याकडे होती, असा थेट आरोप दमानिया यांनी केला आहे. हे सगळे पुरावे मी खर्गे समितीला देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. मात्र, थेट उपमहापौरांचे नाव घेत पॅावर अॅाफ अटर्नीबाबत धक्कादायक माहिती दिल्याने या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढला असल्याचे दिसत आहे. निलेश मगर मुंढवा जमीन प्रकरणामध्ये मोठे प्लेअर असल्याचे मोठं विधानही दमानिया यांनी केले आहे. त्यामुळे आता या जमीन प्रकरणात आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. प्रकरण काय? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे पुण्यातील कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील ४० एकर महार वतनाच्या जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी या कंपनीने ही जमीन आयटी पार्क आणि डेटा सेंटरसाठी विकत घेतली, पण बाजारमूल्यापेक्षा कमी किंमतीत जमीनीचा व्यवहार आणि स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हेही वाचा : Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाने पती जहीर इकबालला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; शेअर केला वडील शत्रुघ्न सिन्हांसोबतचा गोड फोटो