AIMIM Candidate List : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दुसऱ्या टप्प्यातील राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी राजकीय मैदान तापायला सुरुवात झाली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. २९ महापालिकांसाठी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन अर्ज भरायचा आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांची नावे अंतिम टप्प्यात आली असून लवकरच ती जाहीर करण्यात येणार आहे. अशातच ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाने महाराष्ट्रातील काही महापालिकांसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जालना या महापालिकांचा समावेश आहे. या महापालिकेच्या उमेदवारांच्या नावे जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांची पहिली यादी AIMIM चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकद्वारे जाहीर केली आहे. AIMIM 1st list pic.twitter.com/1SNHctyzwO — Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) December 24, 2025 एक्सवररील पोस्टमध्ये त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या सूचनेनुसार 2026 च्या महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहेत, याचा मला आनंद असल्याचे म्हटले आहे. या यादीत सर्वात जास्त उमेदवार छत्रपती संभाजीनगर महापालिकासाठी मैदानात उतरविण्यात आले आहेत. एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग 1 – अझहर अयुब खान प्रभाग 3 – इम्रान पटेल प्रभाग 9 – काकासाहेब काकडे प्रभाग 9 – मतीन माजेद शेख प्रभाग 12 – हाजी शेरखान अब्दुल रहमान खान प्रभाग 28 – साबेर पाशु शेख प्रभाग 28 – अब्दुल मतीन खान प्रभाग 16 – सय्यद फरहान नेहरी जालना महापालिका मोहम्मद माजेद नाशिक महापालिका जबीन रमजान पठाण – प्रभाग 14 नगमा इरफान शेख – प्रभाग 30 इलियास नूर शेख कुरेशी – प्रभाग 15 राज्यातील २९ महापालिकांसाठी २३ डिसेंबरपासून नामनिर्देश अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, ३० डिसेंबर हा अंतिम दिवस आहे. या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. हेही वाचा : महादेव जानकर यांनी घेतला मोठा निर्णय! ‘या’ पक्षासोबत बांधली राजकीय मोट, मुंबईतून घोषणा