Ahan Anit : नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ‘सैयारा’ स्टार अहान पांडे आणि अनित पड्डा एकत्र स्टेजवर रोमँटिक अंदाजात डान्स करताना दिसत आहेत. खरंतर सैयारा चित्रपटातून अहान आणि अनित रातोरात स्टार झाले. दोघांनाही या चित्रपटाने मोठी लोकप्रियता मिळवून दिली. चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दोघेही अनेकवेळा एकत्र स्पॅाट झाले. आता पुन्हा एकदा एका कार्यक्रमात दोघांनी हजेही लावली होती. स्टेजवर दोघेही एकत्र येत त्यांनी रोमँटिक अंदाजात डान्स केला. या व्हिडीओवर आता नेटकरी आणि चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनित पड्डा दोघेही अनेकदा चर्चेत असतात. त्यांचा एकत्रित डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या व्हिडीओमध्ये अहानने अनितचा हात हातात घेताच, प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष झाल्याचे दिसत आहे. त्यानंतर अनितने अहानला मिठी मारली. सैयारा चित्रपटानंतर दोघेही त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. तसेच दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा देखील सोशल मीडियावर हे दोघे ज्यावेळी एकत्र स्पॅाट होतात, त्यानंतर रंगतात. View this post on Instagram A post shared by Manav Manglani (@manav.manglani) या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर एका वापरकर्त्याने म्हटले, “या क्षणातील आयकॉनिक जोडपे.”तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ‘अहान सार्वजनिक ठिकाणी खूप लाजाळू आहे, पण मला आवडते की तो इतर स्टार किड्ससारखा नाही.” अशा काही प्रतिक्रिया नेटकरी आणि चाहत्यांनी या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर दिल्या आहेत. दोघांच्या डेटिंगच्या चर्चा रंगत असल्या तरी याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मॅडॉकने त्यांच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली असून, या चित्रपटाचे नाव ‘शक्ती शालिनी’ असणार आहे. अनित पड्डा हिला मोठी संधी मिळाली असून, या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हेही वाचा : सूर्याची किरणे ठरली विमान वाहतूक विस्कळीत होण्याचे कारण? भारतात अनेक उड्डाणांवर परिणाम