Former MLA Sandeep Naik : पुण्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड काल शनिवार २० डिसेंबरला घडली. वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांनी भाजपात अधिकृत पक्ष प्रवेश केला. तसेच खडवासला विधानसभेची निवडणूक लढविणारे शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे सचिन दोडके यांनी देखील आपल्या हाती कमळ घेतले. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अशातच आता नवी मुंबईच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी आमदार संदीप नाईक यांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे. काल रात्री उशिरा त्यांचा पक्ष प्रवेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. माजी आमदार संदीप नाईक हे विधानसभा निवडणूक होण्याअगोदर भाजपमध्ये होते. मात्र, विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच प्रवेश केला. आता त्यांची भाजपात घरवापसी झाली आहे. त्यांच्यासोबत अनेकांनी भाजपात पक्ष प्रवेश केला आहे. संदीप नाईक यांच्या घरवापसीमुळे नवी मुंबईत भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध करण्यात आल्याची माहिती असून रात्री उशिरा गणेश नाईक यांनी सूत्र हलवत हा पक्ष प्रवेश घडवून आणला आहे. संदीप नाईक यांच्यासोबत २८ माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले आहेत. ताकद वाढणार विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला. गेल्या काही दिवसांपासून हालचालींना वेग आला होता. दरम्यान, संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते भाजपात जाणार हे निश्चित समजले जात होते. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे आगामी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार असून, राजकीय समीकरणे बदलणार आहेत. हेही वाचा : शिरवलीत १२ वर्षांचा वनवास संपला! अखेर गजबजलेला बाजार पुन्हा सुरू; सरपंचांच्या निर्णयाचे कौतुक