वॉशिंग्टन : लैंगिक गुन्ह्यातील वादग्रस्त दलाल जेफ्री एपस्टीनशी संबंधित फायलींचा दुसरा संच अमेरिकेच्या न्याय विभागाने आज प्रसिद्ध केला. या कागदपत्रांमध्ये सरकारी वकिलांच्या एका ई-मेलचाही समावेश आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या खासगी विमानाने वारंवार विदेशात गेल्याचे या ई-मेलमध्ये नमूद केले गेले आहे. अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळापेक्षा हे प्रमाण लक्षणीय जास्त असल्याचे निरीक्षण त्यात नोंदवले गेले आहे. नव्याने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमध्ये सुमारे ३० हजार पानांचा समावेश आहे. मात्र त्यात अनेक ठिकाणी संपादन केले गेले आहे. तसेच काही व्हिडीओ देखील तुकड्या तुकड्यांमध्ये केले गेले आहेत. जेप्री एपस्टीनने २०१९ साली ज्या तुरुंगात आत्महत्या केली, त्या न्यूयॉर्कमधील तुरुंगातच या व्हिडीओंचे शुटिंग करण्यात आले असल्याचे लक्षात येते आहे. ट्रम्प यांनी खासगी विमानाने वारंवार प्रवास करण्यामागील तथ्य नेमके उलगडले गेलेले नाही. या संदर्भात व्हाईट हाऊसने कोणतेही स्पष्टिकरण दिलेले नाही. अलीकडेच स्टीव्ह बॅननच्या सेलफोनवरून सरकारने मिळवलेल्या डेटाचा शोध घेत आहोत आणि आपल्याला या सेलफोनमध्ये ट्रम्प आणि घिसलेन मॅक्सवेलचे फोटो सापडले, असे एका अज्ञात व्यक्तीने २०२१ मध्ये केलेल्या दुसऱ्या ईमेलमध्ये लिहिलेले आहे. मात्र या कागदपत्रांमध्ये काही सनसनाटी आरोप देखील आहेत. २०२० च्या अद्यक्षीय निवडणुकीपुर्वी केवळ खळबळ निर्माण करावी, यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी एफबीआयला या ई-मेल पाठवल्याचा दावा न्याय विभागाने आपल्या स्पष्टिकरणात केला आहे. तथापि, शुक्रवार आणि शनिवारी प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या, त्यात संतापजनक आणि २०२६ च्या मध्यावधी निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाला धोका निर्माण करणाऱ्या घोटाळ्याला आळा घालण्यासाठी फारसे काही करण्यात आले नाही.