Ashish Shelar : काही दिवसांवर राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका येवून ठेपलेल्या आहेत. या निवडणुकीत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष हे मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागलेले आहे. कालच मुंबईतील वरळी येथे भाजप आणि शिवसेनेने महायुतीच्या प्रचाराचा पहिला नारळ फोडला. या पहिल्याच जाहीर सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार असल्याचा निर्धार पुन्हा एकदा बोलून दोघांनी बोलून दाखवला. दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढत आहेत. त्यामुळे आगामी काळातही दोन्ही पक्ष एकत्र येणार का? असा प्रश्न पडला होता. अशातच आता भाजप नेते सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या विधानामुळे लवकरच राजकारणात मोठा भूंकप होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आशिष शेलार हे एबीपी माझा वाहिनीच्या माझा कट्टामध्ये आले होते. त्यावेळी त्यांना शरद पवार हे भाजपसोबत येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना काही दिवसात बॅाम्ब फुटणार असल्याचे सर्वात मोठं विधान त्यांनी केले आहे. यामुळे आगामी काही राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर देखील शेलारांनी भाष्य केले. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली हे चुकीचे केले असल्याचे आशिष शेलार म्हणाले. आशिष शेलारांनी टाकलेल्या राजकीय बॅाम्ब विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका महायुतीच्या ताब्यात घेण्यासाठी महायुतीकडून तशा पद्धतीची रणनिती आखली जात आहे. ठाकरे बंधूंसाठी मुंबई महापालिका निवडणूक अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सावध पाऊल टाकत आहेत. हेही वाचा : अमेरिका-व्हेनेझुएलाच्या संघर्षात किम जोंग उन यांची एन्ट्री; ‘मित्राला सोडा’ म्हणत दिली महायुद्धाचा इशारा