पुणे – जागतिक स्तरावर पुणे शहराची नवी ओळख निर्माण करणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सासवड–बारामती मार्गावरील बोपदेव घाटात सायकलची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध क्रीडा संघटक, सायकलप्रेमी व अमानोराचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धकांच्या स्वागतासाठी ही आकर्षक प्रतिकृती साकारली आहे.सुमारे ६ मीटर उंच व १२ मीटर लांब असलेली ही सायकल रस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून, या ऐतिहासिक स्पर्धेची आठवण ठरणार आहे. उद्या अर्धे पुणे बंद.! ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रोलॉग सायकल स्पर्धेच्या निमित्ताने आज (साेमवारी) स्पर्धा मार्गावरील शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी मेट्रोचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या स्पर्धेत ४० देशातील १७१ स्पर्धक सहभागी होणार आहे. आज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा दरम्यान स्पर्धा मार्ग, तसेच जोडणारे उपरस्ते वाहतुकीस बंद राहणार असल्याने नामदार गोपाळ कृष्ण गाेखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), जंगली महाराज रस्ता, शहरातील मध्यभाग, तसेच स्पर्धा मार्गावरील शाळा-महाविद्यालायांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिले आहेत, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. स्पर्धा मार्गावरील खासगी कार्यालयातील कर्मचारी, व्यावसायिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शक्यतो मेट्रो सेवेचा वापर करावा,’असे आवाहन सहपोलीस आयुक्त शर्मा यांनी केले आहे.