राजगुरुनगर : राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मतदानासाठी मतदारांचा मोठा उत्साह होता. सरासरी 68.95 टक्के मतदान झाले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शैलजा पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली. राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी अखेर संपली. राजगुरूनगर मधील सात ठिकाणी 34 मतदान केंद्रावर मतदान झाले. एकूण 25 हजार 801 मतदारांपैकी 17 हजार 7…… मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार रिंगणात आहेत. 10 प्रभागात 21 नगरसेवकांपैकी 3 नगरसेवक बिनविरोध झाले असून उर्वरित 18 नगरसेवक पदासाठी तब्बल 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची संख्या जास्त असून उबाठा गटाचा नगराध्यक्ष वगळता एकही उमेदवार रिंगणात नाही. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत 17.24 टक्के मतदान झाले तर दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाचा टक्का वाढून तो 37.88 टक्क्यांवर पोहचला. दुपारी साडेतीन वाजता 53.44 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी साडे पाच वाजता मतदान प्रकिया संपल्यानंतर एकूण मतदान 68.95 टक्के मतदान झाले. नगराध्यक्ष पदाच्या पाच आणि 18 नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेल्या 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. एकूणच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रभाग 6 मध्ये बाचाबाची शाळा क्रमांक एकमध्ये प्रभाग क्रमांक 6 वर मतदानाला गर्दी होती. यावेळी दोन उमेदवारांमध्ये काहीशी बाचाबाची झाली. एक मतदारांचे मोबाईल जमा करून घेत होता तर दुसर्या उमेदवाराचे दोघेजण सरकारी अधिकार्याची खुर्ची बळकावत मतदारांना आकर्षित करीत माहिती देत होते. अशी तक्रार एका उमेदवारांकडून पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर तेथे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे व पोिीस तात्काळ आले. त्यांनी संबंधित उमेदवार व महिला उमेदवाराचे पती यांना समज दिली. शासकीय अधिकार्याच्या खुर्चीवर बसून असलेल्या दोघांना ताब्यात घेत त्यांनाही समज दिली नंतर त्यांना तेथून बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी काही क्षण तणावाचे वातावरण पसरले होते. दहा प्रभागातील मतदार संख्या आणि झालेले मतदान (टक्केवारी) प्रभाग क्रमांक एकूण मतदान झालेले मतदान टक्केवारी पुरुष स्रिया एकूण पुरुष स्रिया एकूण 1 1179 1187 2366 2 1348 1257 2605 3 1103 980 2083 4 997 978 1975 5 1285 1283 2568 6 791 766 1557 7 1754 1645 3399 8 1297 1280 2577 9 2007 1856 3863 10 1421+1 1386 2808 एकूण 13182+1 12618 25801 68.95