Chitrangada Singh : ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून अभिनेता सलमान खान कमबॅक करत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. तसेच या चित्रपटात सलमान सोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून, सोशल मीडियावर सेटवरचे फोटो व्हायरल होत असून, आता एक नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सलमान आणि चित्रांगदा एकत्र दिसत आहे. लडाखमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर टीमने मुंबईतील एक वेळापत्रक देखील पूर्ण केले आहे. सोशल मीडियावर सलमान खानचे शूटिंग दरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले होते. आता शूटिंगमधील सलमान खान आणि चित्रांगदाचा आणखी एक फोटो व्हायरल झाला असून, या फोटोमध्ये सलमान आणि चित्रांगदा दोघेही भारतीय सैन्याच्या गणवेशात दिसत आहेत. LATEST SALMAN KHAN #Salmankhan #BattleOfGalwan @IChitrangda pic.twitter.com/DC2XgE7Cv4 — 👑 GalwanValley (@neelikhan7786) December 5, 2025 मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॅटल ऑफ गलवान चित्रपटाचे लडाखनंतर मुंबईतील चित्रीकरणही पूर्ण झाले आहे. हा चित्रपट “इंडियाज मोस्ट फियरलेस ३” या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाची कथा २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षाचे चित्रण दाखविणारी असणार आहे. या चित्रपटात लष्करी अधिकाऱ्याची भूमिका सलमान साकारताना पाहायला मिळणार आहे. ही त्याच्यासाठी वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका असणार आहे. अपूर्व लखिया दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान आणि चित्रांगदा सिंह यांच्यासोबत जेन शॉ, हिरा सोहल, अभिलाष चौधरी, विपिन भारद्वाज आणि अंकुर भाटिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी २०२६ च्या ईदला प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. मात्र, चित्रपटाची अद्यापर्यंत अधिकृत प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही. पण हा चित्रपट सलमानच्या करिअरला आणखी बुस्ट करणार असल्याची चर्चा आहे. हेही वाचा : सोनम कपूरने फ्लॉन्ट केला बेबी बंप; काळ्या साडीत इव्हेंटला हजेरी लावत वेधलं साऱ्यांचे लक्ष