कुपवाडामध्ये मोठा शस्त्रसाठा पकडला
Updated On:

श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी मोठा शस्त्रसाठा पकडला आहे. या शस्त्रसाठ्यामध्ये 5 एके रायफलींचाही समावेश आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी अज ही माहिती दिली. लष्कर आणि पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे रविवारी रात्री उशीरा केलेल्या तपासणीमध्ये हा मोठा शस्त्रसाठा उघडकीस आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या तपासणीमध्ये पाच एके रायफली आणि 7 पिस्तुले, मॅगझीन आणि काडतुसांचा साठा उघड झाला. हा शस्त्रसाठा ताबा रेषेजवळच्या धन्नी गावापासून अगदी जवळच्या भागात आढळून आला. हा भाग लिपा खोऱ्यातील पाकिस्तानी लष्कराच्या ठाण्यांच्या थेट देखरेखीखाली येतो आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.





