Crime News : खेड शिवापूरमध्ये मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त, १७ जण अटकेत

राजगड : खेड शिवापूर परिसरातील एका इमारतीत सुरु असलेल्या मोठ्या प्रमाणावर जुगार अड्ड्यावर राजगड पोलीस स्टेशनने छापा टाकत तब्बल १७ जणांना अटक केली. या कारवाईत एकूण २८,३०० रुपयांची रोकड आणि तिन पत्त्याचे जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई २० जून २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास, खेड शिवापूर गावच्या हद्दीत हॉटेल गार्गी शेजारील एका इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर करण्यात आली. संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी धाड टाकत १७ आरोपींना रंगेहाथ पकडले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –मकरंद दत्ता मेदने (२९) – मजुरी, सिंहगड रोड, माणिकबाग अमित उर्फ गोपळ शिवाजी चिकुदरे (३९) – मजुरी, बिबवेवाडी वैभव सुभाष थोपटे (२७) – नोकरी, सिंहगड रोड ज्ञानेश्वर गजानन बालपांडे (३२) – चालक, धायरी फाटा विठ्ठल बाळू दारवटकर (२९) – शेती, पर्वती जनता वसाहत विनायक राम चित्ते (५२) – दुकान, गुरुवार पेठ गोकुळ वामन धोबी (४६) – मजुरी, सध्या रा. खेड शिवापूर अनिल शशीराव माने (४१) – मजुरी, हडपसर फारूक याकुब शेख (३९) – मजुरी, सध्या रा. खेड शिवापूर लखण महादेव बसटे (३४) – मार्केट यार्ड, सुखसागर नगर राजकुमार केरबा शिखरे (४८) – नोकरी, खेड शिवापूर सलीम शाकीर शहा (३०) – कापड दुकान, सध्या रा. खेड शिवापूर. शब्बीर शेख याकुब (४४) – दुकान, सध्या रा. खेड शिवापूर योगेश रकनेश मिस्त्रा (४२) – नोकरी, हडपसर. राकेश रविंद्र राऊत (३२) – नोकरी, वडगाव ब्रु पंकज प्रकाश गायकवाड (३३) – चालक, वडगाव ब्रु अमित पांडुरंग राऊत (३६) – नोकरी, कोथरूड
कारवाईवेळी मिळालेली रोकड
या सर्व आरोपींकडून तिन पत्त्यांच्या खेळासाठी वापरलेले पत्ते व त्यांच्याकडील एकूण २८,३०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. प्रत्येक आरोपीकडे १,००० ते ३,००० रुपयांपर्यंत रोकड सापडली.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की या कारवाईमुळे खेड शिवापूर व परिसरातील बेकायदेशीर जुगार अड्ड्यांना चांगली चपराक बसली आहे.





