मुंबई – अभिनेत्री लारा दत्ताने 2000 साली आंतरराष्ट्रीय स्तरावर मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून संपूर्ण भारताची मान अभिमानाने उंचावली होती. त्यानंतर लाराने मॉडेल ते एक यशस्वी अभिनेत्री असा प्रवास करत आपली वेगळी ओळख बनवली. अक्षय कुमारपासून संजय दत्तपर्यंत तिने अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र, आता ती मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसतेय. नुकतंच लाराने एक फोटो शेअर केला जो पाहून तिला ओळखणे अनेकांना कठीण जात आहे.
लारा दत्ताने सोशल मीडियावरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने मेकअपशिवाय तिचा चेहरा दाखवला आहे. यासोबतच तिने मेकअप लूकही शेअर केला असून या दोघांमधील फरकाबाबत बोलताना मेकअपच्या गरजेकडे लक्ष वेधले आहे. पोस्ट शेअर करताना लाराने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘कीपिंग इट रिअल! ! असे म्हणत लाराने पोस्ट केलेले बिफोर आणि आफ्टर मेकअप फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. लाराने यावेळी मेकअपबाबत भलं मोठं भाष्य केलं आहे. लाराचा हा फोटो पाहून चाहते मात्र पूर्णपणे गोंधळून गेले आहेत. मेकअपचे बिफोर आफ्टर फोटो चंगलेच व्हयरल होताहेत.
View this post on Instagram
लाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या OTT वर खूप सक्रिय आहे. लाराने 2020 मध्ये हॉटस्टारच्या हंड्रेड मालिकेद्वारे तिने ओटीटी पदार्पण केले, ज्यामध्ये तिने एसीपी सौम्या शुक्लाची भूमिका साकारली होती. गेल्या वर्षी, ती Lionsgate Play च्या Hickups and Hookups या वेबसिरीजमध्ये दिसली होती. लारा दत्ता शेवटची कौन बनेगा शिखरावतीमध्ये दिसली होती.