Maharashtra Weather Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. मराठवाडा, विदर्भासह काही भागात कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याच दरम्यान, आज देखील उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत शनिवारी काही ठिकाणी पाऊस झाला. तर पुण्यातही पावसाने हजेरी लावली. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. आज आणि उद्या मुंबईत काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अलर्ट जारी मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरीला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरातील ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे तयार झाले आहेत. उपसागरातील कमी दाब क्षेत्रापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेत उष्ण-आर्द्रतेचा पट्टा पसरला आहे. यामुळे राज्यभर पावसाला पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, वायव्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे. दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागली असून, काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस कोसळत आहे. शनिवारी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. Maharashtra Weather Update | दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाची गती वाढलेली दिसत आहे. येत्या काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. Maharashtra Weather Update | हेही वाचा: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये गोंधळ ; लंडनमध्ये लाखो लोक रस्त्यावर ; पोलिसांशी झटापट