खरेदीखत झाल्यावर पैसे देतो म्हणून हडपली जमीन; आरोपीचा दुसर्यांदा अटकपूर्व फेटाळला

पुणे – शिरूर येथील जमिनीचा व्यवहार केल्यानंतर खरेदीखत झाल्यावर पैसे देतो असून सांगून जमीन हडपणार्या भालचंद्र मुके याचा अटकपूर्व जामीन दुसर्यांदा फेटाळला. सत्र न्यायधीश ए. एस.वाघमारे यांनी आदेश दिला आहे.
मुके याने शिरूर येथील ९१ आर जमिनीचा व्यवहार ठरवला. त्यावेळी, जमिनीचे खरेदीखत झाल्यावर पैसे देतो असा विश्वास देऊन खरेदीखत झाल्यावर जमीन बळकावित ती परस्पर पुढे विकली. याप्रकरणी, त्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्याने न्यायालयात अर्ज केला. याला सरकारी पक्षासह फिर्यादीतर्फे अॅड. पुष्कर पाटील व अॅड. रोहन खर्चे यांनी विरोध केला.
त्याची गंभीर भूमिका व फसवणुकीचा प्रकार पाहता सत्र न्यायालयाने तो फेटाळला. यानंतर, त्याने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. उच्च न्यायालयाने विसंगती दाखविल्यानंतर मुके याने अर्ज मागे घेतला. अखेर, त्याने पुन्हा शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तो फेटाळण्यात आला.





