Lalit Modi : आयपीएलचे माजी माजी आयुक्त ललित मोदी (Lalit Modi) यांनी बीसीसीआयवर थेट आरोप केला आहे. त्यांच्या मते सध्याच्या आयपीएल फॉरमॅटमुळे बीसीसीआय आणि फ्रँचायझींना प्रत्येक हंगामात सुमारे 2,400 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यांच्या मते, कमी सामने हे याचे सर्वात मोठे कारण आहे. ते म्हणाले, “आम्ही जे विकले होते, ते हे नाही, असेही ते म्हणाले. त्यांनी (Lalit Modi) सांगितले की, सुरुवातीला प्रत्येक संघाने एकमेकांविरुद्ध दोनदा खेळण्याची योजना होती. 2022 मध्ये 10 संघ असताना 90 लीग सामने आणि चार नॉकआउट सामने झाले असते. मात्र, आयपीएलने होम-अँड-अवे प्रणाली बदलून केवळ 74 सामने ठेवले. यामुळे फ्रँचायझींना नुकसान होत आहे. आम्ही जे विकले होते, ते हे नाही. प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला 50 टक्के आणि उर्वरित 50 टक्के संघांमध्ये वाटले जाते. यामुळे संघांना 20 सामन्यांचे नुकसान होत आहे. Lalit Modi ललित मोदी (Lalit Modi) यांच्या विरोधात आयपीएलमध्ये खेळाडूंच्या बोलीमध्ये हेराफेरी, मनी लॉन्ड्रिंग आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) च्या उल्लंघनाची प्रकरणे सुरू आहेत. त्यांनी सांगितले की, आयपीएलची खरी किंमत होम-अँड-अवे फॉरमॅटमध्ये आहे. जर कॅलेंडरमध्ये सामन्यांसाठी जागा नव्हती, तर संघांची संख्या वाढवायला नको होती. ते म्हणाले, आम्ही आयपीएल अशा प्रकारे विकले नव्हते. त्यांनी प्रश्न विचारला की सर्व संघांनी या बदलाला सहमती दिली होती का आणि म्हणाले की असे झाले नसेल. 94 सामने असते तर… ते म्हणाले, जर होम-अँड-अवे फॉरमॅटमध्ये 94 सामने झाले असते आणि प्रत्येक सामन्याची किंमत 118 कोटी रुपये असती, तर मीडिया हक्कांमधून 2,400 कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई झाली असती. म्हणजेच, बीसीसीआयला 2,400 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला असता. यापैकी 1,200 कोटी रुपये 10 संघांना मिळाले असते, प्रत्येक संघाला 120 कोटी रुपये, आणि संघांचे मूल्य वाढले असते. मोदी यांचे झाले होते निलंबन ललित मोदींना 2010 मध्ये आयपीएलच्या तिसऱ्या हंगामाच्या अंतिम सामन्यानंतर लगेचच बीसीसीआयने निलंबित केले. त्याच वर्षी अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळाल्याचे कारण देत ते भारत सोडून लंडनला गेले. नंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्याविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आणि त्यांचा पासपोर्टही रद्द करण्यात आला. तेव्हापासून ललित मोदी (Lalit Modi) लंडनमध्ये राहत आहेत. त्यांच्याविरुद्ध आयपीएलमध्ये खेळाडूंच्या लिलावात हेराफेरी, मनी लॉन्ड्रिंग आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) च्या उल्लंघनाची प्रकरणे सुरू आहेत.