पुणे : हडपसरमध्ये लालाची तर येरवड्यात पिन्याची दहशत

पुणे – हडपसरमधील भगवा चौकात स्वयंघोषीत दादा लाला उर्फ आकाश जाधव याने चाकुच्या धाकाने दहशत पसरवली. यामध्ये एका रिक्षा चालकाला शिवीगाळ करत त्याच्यावर चाकूने वार करण्यात आला. ही घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अनिकेत विनोद म्हस्के(27,रा.वेताळबाबा वसाहत,हडपसर ) हे रिक्षा चालक आहेत. ते घटनेच्या दिवशी रिक्षा घेऊन चौकातील रिक्षा थांब्यावर आले होते. यावेळी त्यांच्या परिचयातील लाला हातात चाकू घेऊन मी येथील दादा आहे, माझ्या नादाला कोणी लागायचे नाही म्हणत दहशत पसरवत होता. फिर्यादीला पहाताच त्याने त्यांच्या जवळ येऊन फिर्यादीने दोन महिण्यापुर्वी लाला व त्याच्या भावाची भांडणे सोडविल्याचा जाब विचारला. तुला आमच्या मध्ये पडायची काय गरज असे म्हणत शिवीगाळ करुन त्याच्या हनुवटीवर चाकुने वार केला. यानंतर लाला तेथून पसार झाला. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

-येरवड्यात दहशत पसरवत एकास लूटले-
येरवडा येथे यशवंतनगरमध्ये शनिवारी सायंकाळी दोघांनी हातात कोयता व लाकडी बांबू घेऊन दहशत पसरवली. तेथून जणाऱ्या एकास मारहाण करुन रोकड आणी मोबाईल चोरण्यात आला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी निलेश उर्फ पिन्या संजय साळवे आणी राकेश उर्फ सुरेश साळवे(22,रा.येरवडा) या दोघांना अटक केली आहे.

फिर्यादी अक्षय गोरखे(24,रा.वाघोली) हे घराचे भाडे आणण्यासाठी यशवंतनगरमध्ये गेले होते. यावेळी तेथे पिन्या आणी राकेश हे हातात कोयता व बांबू घेऊन दहशत पसरवताना दिसले. त्यांनी अक्षयला अडवून शिवीगाळ करत खिशातील 80 रुपये आणी दहा हजाराचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. यानंतर तेथूनच जाणाऱ्या समीर कुरेशी यालाही मारहाण केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरक्षक ननावरे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.