Lakhimpur : शेतकऱ्यांचा आवाज दाबवण्याचा हिंसक प्रयत्न; शरद पवार संतापले

मुंबई : लखीमपूर खेरीच्या घटनेचे केवळ उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशात पडसाद उमटताना दिसत आहे. तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
२५ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या एका विधानाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आठवडाभरानंतर हिंसक वळण लागले आहे. या हिंसाचारामध्ये एक पत्रकार आणि चार शेतकऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शरद पवार यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला.
शरद पवार म्हणाले की, आमच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी केलेलं हे हिंसक कृत्य आहे. मी उत्तर प्रदेशातील लखीपूर खिरी येथे झालेल्या घटनाचे तीव्र शब्दात निषेध करतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हमारे किसानों की आवाज को दबाने का बर्बर तरीका। मैं उत्तर प्रदेश के लखीमपुर खीरी में हुई घटना की कड़ी निंदा करता हूं।#लखीमपुर_खीरी_नरसंहार
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 3, 2021
दरम्यान लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना 45 लाख आणि जखमींना 10 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल, अशी माहिती एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी दिली.





