Pune Crime News : शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालय परिसरात दोन महिला वकिलांमध्ये झालेल्या वादातून हाणामारीची गंभीर घटना घडली आहे. या घटनेत एका वकिलाच्या डोक्याला टोकदार वस्तूने मार लागून रक्तस्राव झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार ॲड. (४२ रा. भवानी पेठ) या गेल्या दीड वर्षांपासून मोटार वाहन न्यायालय, शिवाजीनगर येथे वकिली व्यवसाय करीत आहेत. त्यांचा आरोप आहे की, न्यायालयीन प्रकरणे जास्त प्रमाणात मिळत असल्याच्या कारणावरून दोन महिला वकिलांशी त्यांचे यापूर्वी वाद झाले होते. दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी त्या न्यायालयात कामासाठी आल्या असता संबंधित दोन वकिलांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दिवसभर त्या त्यांच्या मागे फिरत “आज कुणालाही काम करू देणार नाही, पैसे कमवू देणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. यानंतर दुपारी सुमारे पुन्हा वाद वाढला. तक्रारदार न्यायालयाबाहेर पडत असताना एका आरोपीने पाठीवर बुक्की मारली. त्यानंतर दोघींमध्ये झटापट झाली. केस ओढणे, हातघाई अशी मारहाण झाली. त्यावेळी दुसऱ्या महिला वकिलानेही मारहाण केल्याचा आरोप आहे. झटापटीदरम्यान एका वकिल महिलेने टोकदार वस्तूने डोक्यावर वार केल्याने तक्रारदारांच्या डोक्याला जखम झाली व रक्तस्राव सुरू झाला. त्यांना चक्कर आल्याने सहकाऱ्यांनी आधार दिला. न्यायालयातील नर्सकडून प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना रास्ता पेठ येथील धन्वंतरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले. घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला