पुणे | रास्त भावात लाडू-चिवडा विक्री उपक्रम उद्यापासून

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहर आणि परिसरातील गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दि पूना मर्चंट्स चेंबरकडून मागील अनेक वर्षांपासून “रास्त भावात लाडू-चिवडा विक्री’ चालविण्यात येते. या उपक्रमाची सुरुवात यंदा गुरुवारपासून (दि. २४) होणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन मार्केट यार्ड, गंगाधाम चौकाजवळील येथील जय जिनेंद्र प्रतिष्ठानचे नाजुश्री सभागृह येथे दुपारी साडेचार वाजता जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
त्यावेळी माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, राजेश शहा, प्रवीण चोरबेले, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, नवीन गोयल, शाम लढ्ढा, उत्तम बाठिया, संकेत खिंवसरा, प्रणव गुगळे उपस्थित होते.
“ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालणार्या चेंबरच्या या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यावर्षी लाडू व चिवड्याची विक्री १८० रुपये किलो आणि अर्धा किलोची ९० रुपये दराने विक्री होणार आहे. दि पूना मर्चट्स चेंबरने सुरू केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे यंदा ३७ वे वर्ष आहे.
लाडू-चिवडा वितरण केंद्र –
दि पूना मर्चंटस् चेंबर व्यापार भवन, गुलटेकडी, मार्केट यार्ड
ग्राहक पेठ, एस.पी. कॉलेजसमोर, टिळक रोड, पुणे
आझाद मित्र मंडळ, पुष्प मंगल कार्यालय, बिबवेवाडी
मे. जयश्री ग्रोसरी अन्ड ड्रायफ्रूटस प्रा. लि., शॉप नं. 8/9/10, बँक आफ महाराष्ट्र शेजारी, शिवालाेक हौ. सोसायटी, कोथरुड, पुणे
भगत ट्रेडर्स, सिंहगड रोड, अभिरुची मॉलसमोर
जगदीश ट्रेडिंग कंपनी, वैभव टॉकीजमागे, महेश सहकारी बँकेशेजारी, हडपसर
कुवाड कोठारी सप्लाय कंपनी, 37/41, प्रोसप्रेरीटी सोसायटी, विठ्ठल मंदिरजवळ, कोकोनट शॉप जवळ, कर्वेनगर
व्ही. एन. एंटरप्राईजेस, 81, अभिनव सोसा., ज्ञानराज, पद्मावती मंदीराजवळ
अर्बन बाझार, माणिक बाग, हॉटेल ब्रह्मवेद जवळ, सिंहगड रोड
पवन ट्रेडर्स, संघर्ष चौक,समृध्दी मार्केट, दु. नं. 22, चंदननगर
विजय ट्रेडिंग कंपनी, कोनार्क पुरम सोसा. समोर, कोंढवा बस स्टॉप जवळ, कोंढवा खुर्द
श्री वर्धमान जैन श्रावक संघ श्री वर्धमान जैन स्थानक भवन, आकुर्ड पोस्ट आफीस जवळ, विवेकनगर, आकुर्ड
ॲड. योगेश जैन कार्यालय, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल, खडकी
सह्याद्री सेवा प्रतिष्ठान, लक्ष्मीनगर, पर्वती
चोरडिया कॉर्नर, शांतीनगर सोसायटी जवळ
न्यू टिंबर मार्केट, टिंबर भवन
डायग्नोल मॉल, टाटा मोटर्स मटेरियल गेट समोर, चिंचवड
डेस्टिनेशन सेंटर मॉल, सिंहगड रोड, नांदेड सिटी
पुण्यक सोसायटी, टेम्पो चौक, वडगाव शेरी
तनिष्क सोसायटी श्री हॉस्पिटल जवळ, खराडी
बी.एम.सी. कॉलेज, शिवाजीनगर, पुणे
शंकरशेठ रोड सेव्हन लव्हज चौकाजवळ




