Kiran Mane। Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने काही महिन्यांपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरू केली होती. या योजनेद्वारे दरमहा महिलांच्या खात्यामध्ये 1500 पाठवले जात होते. आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्याने महिलांच्या खात्यावर सरकारकडून 2100 रुपये पाठवण्यात येणार आहे. या पैशांमुळे महिलांना आर्थिक मदत मिळेल आणि त्या आपल्या गरजा चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतील. हा योजना सुरु करण्यामागचा उद्देश होता. ही योजना फक्त महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आहे. आता या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रार आलेल्या अर्जांची छाननी होऊन लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अश्यातच, मराठी अभिनेते किरण माने यांनी ‘लाडकी बहीण योजनेवर’ प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तसेच सत्ताधारी नेत्यांना देखील खोचक टोला लगावला आहे. किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये ते म्हणतात, “बहिणींना दरमहा दिलेला खाऊ आणि “पैशे आले का?” हे विचारणारा भाऊ… दोन्हीही गुंडाळून डस्टबीन मध्ये फेकून दिलेले आहेत ! काम झाले, विषय संपला. लाडक्या तायांनो, आता रस्त्यारस्त्यावर समोर येणाऱ्या प्रज्वल आणि ब्रिजभूषणपासून तुम्ही स्वतःच स्वतःचं रक्षण करा !’ असं ते म्हणाले आहेत. अभिनेते किरण माने यांच्याविषयी थोडक्यात…. किरण माने नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर जाहीरपणे रोखठोक भूमिका मांडत असतात. त्यांच्या पोस्टवर नेटकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात कमेंट करत आपल्या भावना व्यक्त करतात. अभिनेते किरण माने हे ‘बिग बॉस मराठी सीजन 4’च्या पर्वामध्ये दिसून आले होते. त्यांनी तो सीजन चांगलाच गाजवला देखील होता.