मुंबई : डिसेंबरचा तिसरा आठवडा आला तरी अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप महिलांच्या खात्यात जमा झाले नव्हते. त्यामुळे हे पैसे येणार कि नाही याची चर्चा रंगली होती. तसेच मकरसंक्रांती दरम्यान डिसेंबर आणि जानेवारीचा हफ्ता एकत्र येणार अशीदेखील चर्चा रंगली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार हे जाहीर केले आहे. कधी येणार पैसे? आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही. सहावा हप्ता याच महिन्यात मिळणार, अधिवेशन संपल्यानंतर खात्यावर पैसे येणार असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. 23 डिसेंबरपासून लाडक्या बहिणीचे पैसे जमा व्हायला सुरुवात होतील अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. निकषांवरील बदलावर केले वक्तव्य लाडकी बहीण योजनेचे निकष तूर्तास तरी बदलण्यात येणार नाहीत असेदेखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. बजेट 2025 नंतर लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये वाढ होऊन ती २१०० रुपये करण्यात येणार आहे.