Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत आहे. कधी या योजनेतील महिलांना अपात्र ठरवल्याने, तर कधी या योजनेतील रक्कमेतील वाढ करण्यामुळे सातत्याने या योजनेची चर्चा होत आहे. यातच आता नाशिक मधून एक विचित्र घटना समोर आली आहे.
नाशिकच्या पारेगावमधील महिलेच्या खात्यात फक्त 500 रुपये जमा झाल्याने या महिलेने संताप व्यक्त केला आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून माझ्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा झाले आहेत.
त्यानंतर सरकारने 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली. त्यानंतर राज्य सरकारने 1500 रुपये दिले. पण माझ्या खात्यामध्ये फक्त 500 रुपये जमा झाले असल्याचं या महिलेने सांगितलं आहे. सध्या घटनेचे सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.
महिला वर्गात ही योजना लोकप्रिय आहे आणि मतांच्या राजकारणात त्याचा फायदा सत्ताधारी महायुतीला झाल्याचं आपण पाहिलं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फायदा झाला असून, या योजनेची रक्कम देखील वाढवण्यात आली आहे. निवडणुकी दरम्यान सरकारने 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली होती.