Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ ई-केवायसी सुरू झालीच नाही; दोन दिवसांपासून फिरणारा तो मेसेज बनावट
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पुन्हा सुरू झाल्याचे संदेश व्हायरल. अनधिकृत लिंकपासून दूर राहण्याचे जळगाव महिला व बालविकास कार्यालयाचे आवाहन.

Ladki Bahin Yojana : गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पुन्हा सुरू झाल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मात्र, जळगाव जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पुन्हा सुरू करण्याबाबत शासनाकडून नवीन निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे महिलांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
आधार क्रमांक, ओटीपी किंवा बँक खात्याची माहिती देऊ नये. अशा लिंकद्वारे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.
शासनाचे अधिकृत निर्देश आल्यानंतर वृत्तपत्रे आणि अधिकृत सोशल मीडिया माध्यमांतून माहिती दिली जाईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी सांगितले.





