Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधीपर्यंत जमा होणार? संभाव्य तारीख समोर
Ladki Bahin Yojana : जुलै महिन्याचा 1500 रूपयांचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिलांना प्रतिक्षा

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. मात्र ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून काही नियम आणि अटी ठेवण्यात आल्या होत्या, मात्र त्यावेळी सरसकट अर्ज पात्र ठरवण्यात आले होते. आता या अर्जांची छाननी केली जात असून निकषात न बसणाऱ्या आणि ई-केवायसी न केल्याने अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जात नाहीत.
परंतु जुलै महिन्याचा 1500 रूपयांचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने पात्र महिला प्रतिक्षा करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे येण्याची दाट शक्यता आहे.
आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींच्या निधीचे थेट हस्तांतरण करण्याचा अंतिम निर्णय होऊ शकतो. जर 18 ऑगस्टपर्यंत हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही तर मग थेट रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून महिलांच्या खात्यात थेट 3000 हजार जमा होऊ शकतात, अशी देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे पात्र महिलांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा:
PMRDA News: शासनाचा नियम धाब्यावर? पीएमआरडीएला मराठीचा विसर; इंग्रजीत अंक छापल्याने तीव्र संताप






