Ladki Bahin Yojana। राज्य सरकारची महत्वकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार असल्याची माहिती समोर आलीय. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. सोबतच घेतलेले पैसेदेखील वसूल केले जाणार आहे, एवढच नाही तर त्यांची वेतनवाढ ही रोखली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले पैसे Ladki Bahin Yojana। अडीच कोटी लाडक्या बहिणींची केवायसी सुरू केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्यात. पाच हजार सरकारी कर्मचारी तर तीन हजार शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आलीय. ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना महिला बाल विकास विभागाकडून पत्र पाठवून कारवाई केली जाणार आहे. अडीच कोटी महिलांपैकी एक कोटी तीस लाख महिलांची आतापर्यंत ई केवायसी पूर्ण झालीय. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख असली तरी अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनीही निवडणूक काळातील गडबडीचा लाभ घेत या योजनेचे रक्कम लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा सुमारे पाच लाख महिला लाभार्थींनी कुटुंबांची उत्पन्न मर्यादा अधिक असूनही लाडकी बहीणचे पैसे लाटले आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. आत्तापर्यंत राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या अडीच कोटी महिलांपैकी आतापर्यंत १ कोटी ३० लाख महिलांचे ईकेवायसी पूर्ण झाले आहे. अद्यापही १ कोटीवर महिलांचे ईकेवायसी पूर्ण झालेले नाही. त्यांच्यासाठी ३१ डिसेंबरची मुदतवाढ देण्यात आली आहे. एवढ्या वेळेत ईकेवायसी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र त्याही वेळेत ईकेवायसी पूर्ण न झाल्यास पुढील निर्णय घेतला जाईल. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे पती किंवा वडील दोघेही हयात नाहीत, त्यांनी त्यांचे मृत्यूपत्र अंगणवाडी सेविका कार्यालयात दिल्यास त्यांनाही आपले ईकेवायसी पूर्ण करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.