नवी दिल्ली – पूर्व लडाखमधील पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी आज भारत आणि चीन यांच्यातील लष्करी पातळीवरील चर्चेची सातवी फेरी झाली. गेले सहा महिने हा पेचप्रसंग उद्भवला आहे.
पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर भारतीय हद्दीत चुशुल येथे ही चर्चा झाली. त्यात भारतीय बाजूचे नेतृत्व लेफ्टनंट हरिंदरसिंग यांनी केले. ते लेह येथील 14 कॉर्पसचे कमांडर आहेत. या चर्चेत विदेश व्यवहार मंत्रालयातील जॉईंट सेक्रेटरी नवीन श्रीवास्तव हेही सहभागी झाले होते. सध्याच्या पेचप्रसंगामुळे दोन्ही बाजूंचे सुमारे एक लाख सैन्य त्या भागात तैनात करण्यात आले आहे.
Seventh round of Corps Commander-level talks between India and China is scheduled to begin at 1200 hours today at Chushul in Eastern Ladakh. The Indian side would be represented by outgoing 14 Corps Chief Lt Gen Harinder Singh and his successor Lt Gen PGK Menon.
— ANI (@ANI) October 12, 2020
या तणावावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू असली तरी दोन्ही बाजूंकडून तेथे मोठ्या प्रमाणात लष्करी यंत्रणाही तैनात केली जात असल्याने हा तणाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. पूर्व लडाखमध्ये दोन्ही सैन्यांची एप्रिल महिन्यात जी स्थिती होती ती कायम ठेवली जावी आणि त्यासाठी चीनने आपले सैन्य मागे घ्यावे, अशी भारताची भूमिका आहे.