कामगार नेते दत्ता सामंत हत्या प्रकरण; पुराव्याअभावी गॅंगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता
Updated On:

मुंबई – कामगार नेते दत्ता सामंत हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन आणि गॅंगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निर्णय मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणी छोटा राजनला निर्दोष ठरवण्यात आले आहे.
विशेष सीबीआय न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी राजनची “पुष्टीकारक पुराव्याअभावी” सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यातील तो एकमेव आरोपी होता. यापूर्वी दोन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले होते.
दत्ता सामंत हत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात आज सुनावणी पार पडली. 16 जानेवारी 1997 रोजी डॉ. दत्ता सामंत यांची गाडी रोखत त्यांच्यावर गोळीबार करत निर्घृण हत्या करण्यात आली होती.



