दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वाल बाद झाला. त्याने मिचेल स्टार्कच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला, पण तिसऱ्या चेंडूवर स्टार्कने त्याला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. पहिल्याच षटकातील या धक्क्यानंतर राजस्थानचा संघ अडचणीत आला होता. मात्र, त्यानंतर कर्णधार रियान पराग आणि यष्टीरक्षक ध्रुव जुरेल यांनी संघाचा डाव सावरून पुढे नेला.
\n\n\n\nInnings break!
\nRiyan Parag and Donovan Ferreira sail #RR to 225/6 🔥
\nWill #DC chase it down? 🤔
\nUpdates ▶️ https://t.co/6OOjzHtrt5#TATAIPL | #KhelBindaas | #RRvDC pic.twitter.com/uaXSEiwsF8
\n— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2026
\nराजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर २२६ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या राजस्थानने २० षटकांत दोन गडी गमावून २२५ धावा केल्या. त्यांच्यासाठी रियान परागने सर्वाधिक ९० धावा केल्या. दरम्यान, डोनोव्हन फरेराने दोन चौकार आणि चार षटकारांसह १४ चेंडूंमध्ये नाबाद ४७ धावा केल्या.