Shivangi Joshi-Kushal Tondon Dating | छोट्या पडद्यावरील अभिनेता कुशाल टंडन आणि अभिनेत्री शिवांगी जोशी अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. यामुळे अनेकदा त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगल्या. अखेर कुशालने याबाबत मौन सोडले आहे. कुशलने शिवांगी जोशीला डेट करत असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. याबाबत कुशालने नात्यात हळूहळू पुढे जात आहे आणि लग्नाचाही विचार करत असल्याचे सांगितले. दरम्यान, शिवांगी आणि कुशालने ‘बरसातें’ ही मालिका करत होते. 26 वर्षांची शिवांगी तिच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या 39 वर्षीय कुशाल टंडनशी लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. तेव्हा ही अफवा असल्याचेही काही जण म्हणत होते. मात्र आता कुशालने त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. आता त्यांचं प्रेमाचं नातं अधिकृत झाल्यानंतर चाहते खूश आहेत. Shivangi Joshi-Kushal Tondon Dating | याआधी शिवांगीचे नाव मोहसिन खानसोबत जोडलं गेलं होते. शिवांगी आणि मोहसिनने नात्याची कबुली दिली होती, पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. शिवांगी आणि मोहसिनने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये सहा वर्षे काम केलं होतं. तर कुशाल अभिनेत्री गौहर खानबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, पण ब्रेकअपनंतर गौहरने जैद दरबारसोबत लग्न केले. हेही वाचा: आलिया भटचा ‘जिगरा’ OTTवर कधी रिलीज होणार?