प्रभात वृत्तसेवा चिंबळी – कुरुळी (ता. खेड) येथील कुरुळी गावठाण ते चाकण एमआयडीसी कडवस्ती रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्याची त्वरित रस्त्याची करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पुणे नाशिक महामार्ग ते कड वस्ती एमआयडीसी रस्ता सुमारे दोन किमी अंतर असून सकाळी आणि सायंकाळी पुणे नाशिक मार्गावरती होणारी वाहतूक कोंडीमुळे या रस्त्याने मोठ्या प्रमाणात कामगारांच्या बसेस मालवाहतूक गाड्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहतूक करत असतात. या रस्त्यावर असणार्या इंग्लिश मीडियम स्कूल, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संघर्ष करत शाळेपर्यंत पोहोचावे लागते या मार्गावरती दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणार्या साईट पट्ट्या खचल्या असून पायी चालणे अवघड झाले आहे. ओढ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर रस्त्यावर येते. “कुरुळीगावठाण ते चाकण एमआयडीसी कडवस्ती रस्त्यावर असणार्या ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्यावर आनंद इंग्लिश मीडियम स्कूल समोर रस्त्यावर पाणी येते. त्यामुळे खड्डे पडले असून या कामाबाबत ग्रामपंचायत सरपंच यांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना पत्र व्यवहार केला आहे; परंतु अधिकारी लक्ष देत नाहीत.” -कविता कोतवाल, ग्रामआधिकारी “कुरुळी ते कडवस्ती रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणार्या साइडपट्ट्या, गटार, खड्डे याबाबत कायम स्वरुपी उपाययोजना करण्यात यावी यासाठी प्रशासन आणि लोक प्रतिनिधी यांनी प्रमाणिकपणे मनापासून काम करण्याची गरज आहे; अन्यथा कुरुळी ग्रामस्थ रस्त्यावर येऊन आंदोलन करतील.” -रमेश बागडे, माजी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी कुरुळी “पुणे-नाशिक महामार्ग ते कडवस्ती एमआयडीसी कडे जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीट करण्यासाठी पीएमआरडीएकडे प्रस्ताव दिला आहे कुरुळी ते कडवस्ती रस्त्याची पाहणी करून खड्डे व साइड पट्ट्या भरणार आहे.” -संतोष पवार, सहायक अभियंता चाकण सार्वजनिक बांधकाम विभाग