कुंटणखाना प्रकरणी ‘या’ नेत्याला अटक; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

नाशिक : राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कुंटणखाना प्रकरणी एका राजकीय नेत्याला नाशिक क्राइम ब्रँचकडून अटक करण्यात आली आहे. नाशिकमधील तपोवन इथल्या एका हायप्रोफाइल सोसायटीत हा कुंटणखाना सुरू होता. या ठिकाणी नाशिक पोलिसांनी धाड टाकून या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी एका राजकीय नेत्याला अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
तपोवन इथल्या हायप्रोफाइल सोसायटीत कुंटणखाना सुरू होता. राजकीय नेत्याच्या वरदहस्ताने हा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कविता साळवे पाटील नावाची महिला हा कुंटणखाना चालवत होती. तिला पवन क्षीरसागरचा सपोर्ट होता असा आरोप होत होता. यानंतर पोलिसांनी थेट कारवाई करत पवन क्षीरसागरला अटक केली. पवन क्षीरसागर हा आरपीआय आठवले गटाचा उत्तर महाराष्ट्र संघटक आहे.
कुंटणखाना जिथं चालू होता त्या परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. फेब्रुवारी महिन्यात नागरिकांनी ठिय्या आंदोलनही केलं होतं. कुंटणखान्याकडे जाणारे तरुण आणि ग्राहक हे परिसरात राहणाऱ्यांना पत्ता विचारतात, काही दारू पिऊन आलेले असतात, गुंड असतात. या सगळ्यांचा त्रास येथील नागरिकांना होत होता.





