कुणाल कामरा यांच्या विमान प्रवासावर बंदी
Updated On:

मुंबई : इंडिगो आणि एअर इंडियानंतर स्पाइसजेट आणि गोएअर यांनीही बुधवारी स्टॅन्ड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. कमारा यांनी मंगळवारी इंडिगोच्या मुंबई-लखनऊ विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना त्रास दिला होता.
इंडिगोने कमरा यांच्या विमान प्रवासावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. तर पुढील आदेश मिळेपर्यंत एअर इंडियानेही त्यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी या घटनेची दखल घेत इतर विमान कंपन्यांनाही कामरा यांच्यावर अशीच बंदी घालण्याचा सल्ला दिला.
हरदीपसिंग पुरी की, आक्षेपार्ह वर्तन करणे, विमानामध्ये अनागोंदी निर्माण करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. अशा प्रवाश्यांपासून इतरांना धोका निर्माण होत असल्याचे मंत्री म्हणाले.





