नवी दिल्ली – हिमाचलातील कुल्लु जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे कुल्लू-मंडी राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. ताज्या अपडेटनुसार, राष्ट्रीय महामार्गावर काल झालेल्या भूस्खलनामुळे पंडोह आणि कमंद मार्गे कुल्लू-मंडी रस्ता ब्लॉक झाला आहे.
हिमाचल प्रदेशात संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की आर्थिक नुकसान सुमारे 12,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अनेक ठिकाणचे रस्ते अजूनही बंदच आहेत. यंदाच्या पावसाळ्यात दोन वेळा पावसाने प्रचंड मोठा तडाखा दिला. आता पुन्हा या राज्यात पावसाने थैमान घातले असून प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
दोन आठवड्यांच्या कालावधीत, हिमाचल प्रदेशात विविध ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. विविध ठिकाणच्या दुर्घटनांमध्ये आत्ता पर्यंत या राज्यात 367 बळी गेले आहेत.