Krunal Pandya’s heroic 73 run knock under injury goes unnoticed : आयपीएल २०२६ च्या रविवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. या विजयाचा खरा शिल्पकार कोण, यावरून आता क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्याने होऊन देखील ४६ चेंडूत ७३ धावांची स्फोटक खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मात्र, या सामन्यानंतर ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब भुवनेश्वरला दिल्याने क्रुणालवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. क्रुणालच विजयाचा खरा ‘हिरो’ का? भुवनेश्वर कुमारने मुंबईच्या ४ महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले आणि शेवटच्या षटकात एक षटकारही मारला, यात शंका नाही. मात्र, रायपूरची खेळपट्टी गोलंदाजांसाठी पोषक असताना क्रुणाल पंड्याने त्यावर ५ षटकार आणि ४ चौकारांची आतषबाजी केली. विशेष म्हणजे, जेव्हा विराट कोहली, देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार रजत पाटीदार यांसारखे दिग्गज फलंदाज स्वस्तात बाद झाले, तेव्हा क्रुणालने किल्ला लढवला. प्रतिकूल परिस्थितीत त्याने उभारलेली ७३ धावांची भिंत भुवनेश्वरच्या ४ विकेट्सपेक्षा अधिक प्रभावी वाटत होती. S Badrinath said, “Krunal’s leg cramp, Rickleton didn’t say, ‘Krunal, you die because of cramp, but he came to stretch Krunal.”pic.twitter.com/LEjXpXqLmt — CricketGully (@thecricketgully) May 11, 2026 क्रृणाल पंड्याने शेअर केला दुखापतीचा फोटो- कृणालने स्वतः त्याचा एक फोटो शेअर केला. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “काही व्रण हे याचं द्योतक असतात की, लढाई सार्थक ठरली.” “दर्द इतना भी नहीं है कि छुपा भी न सकूँ” मैच विनिंग पारी के बाद क्रुणाल ने शेयर की तस्वीर जिसमें उन्होंने अपने चोट को जीत के लिए यथार्थ है …#KrunalPandya #RCBvsMI #IPL #CricketNews pic.twitter.com/4y1GIMfL8U — GNTTV (@GoodNewsToday) May 11, 2026 हेही वाचा – Andy Flower Fined : आरसीबीच्या विजयाला गालबोट! हेड कोच अँडी फ्लॉवरला अंपायरशी नडणं पडलं महागात; बीसीसीआयने ठोठावला मोठा दंड दुखापत असूनही मैदानावर झुंज – क्रुणाल पंड्याचा हा संघर्ष केवळ धावांपुरता मर्यादित नव्हता. दीपक चाहरचा एक वेगवान चेंडू थेट त्याच्या पोटाला लागला आणि त्याच वेळी त्याच्या पायाचे स्नायूही (Hamstring) ओढले गेले. चालणे कठीण असतानाही तो मैदानावर ठाम उभा राहिला. १८ व्या षटकात अल्लाह गझनफरला दोन मोठे षटकार ठोकून त्याने सामन्याचे पारडे आरसीबीच्या बाजूने झुकवले. जरी तो शेवटच्या चेंडूवर बाद झाला असला, तरी त्याने केलेल्या या खेळीमुळेच आरसीबीला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवता आला. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, कठीण खेळपट्टीवर दुखापतीशी झुंज देत केलेली ही खेळी ‘मॅन ऑफ द मॅच’साठी अधिक प्रबळ दावेदार होती.