मुंबई – “आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अभिनेता प्रभास ही सुंदर जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. हे दोघेही एकत्र छान दिसतात. या चित्रपटात राघवच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंह आहे. या पौराणिक कथेत तगडा व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे.
आदिपुरुषचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे, तर भूषण कुमार यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 16 जूनला रिलीज होणार आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशन मध्ये व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच आदिपुरुष चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं एका प्रसिद्धीवृत्तवाहिनीला क्रितीनं मुलाखत दिली.
त्यावेळी क्रितीनं प्रभासबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या. या गोष्टी सांगत असताना तिनं प्रभासबद्दल भरभरून कौतुक केलं. ती म्हणाली की, “प्रभास हा जमिनीवर पाय असलेला अभिनेता आहे. याचवेळी क्रितीनं प्रभासच्या एका गोष्टीचं भरभरून कौतुक केलं आहे. क्रिती सेनॉन म्हणाली की, ‘मी असं ऐकलं होतं की तो स्वतःमध्ये मग्न असतो.
पररंतु मी जेव्हा त्याला भेटले तेव्हा मला तो लाजाळू स्वभावाचा व्यक्ती वाटला. मी सुरुवातीला त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. मी त्याला सांगितलं की, माझा पहिला सिनेमा तेलुगु होता. हे मी सगळं मी त्याला सांगितल्यावर तो हळूहळू माझ्याशी खुलून बोलू लागला आणि आमची चांगली मैत्री देखील झाली. असं क्रिती म्हणाली.
क्रिती पुढे म्हणाली, “प्रभास एकदम प्रभू रामांप्रमाणे सिंपल आहे. मला सांगावेसे वाटते की तो खूप साधा आणि मनाने साफ व्यक्ती आहे. तसेच चित्रपटानंतर जानकी बाबतचे प्रेम आणि आदर आणखी वाढल्याचे देखील क्रितीने यावेळी सांगितले.