राठोड यांच्या विरोधात कृष्णा पुनिया

नवी दिल्ली -कॉंग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत ऑलिम्पिक खेळाडू कृष्णा पुनियाला जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कृष्णा पुनियाने ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये थाळीफेक प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आतापर्यंत 325 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

कृष्णा पुनिया सध्या राजस्थानच्या सादुलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे. कृष्णा पुनियाची थेट लढत राज्यवर्धन राठोड यांच्याबरोबर होणार आहे. ऑलिम्पिक पदक विजेते राज्यवर्धन राठोड केंद्र सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री आहेत. राज्यवर्धन राठोड जयपूर ग्रामीणचे खासदार आहेत.

कॉंग्रेसने सोमवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये सहा राजस्थानचे, दोन महाराष्ट्र आणि एक गुजरातचा उमेदवार आहे. 2010 साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत कृष्णा पुनियाने थाळीफेकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.