Tokyo Paralympics : कृष्णा नागरचा सुवर्णस्मॅश
Updated On:

टोकियो – टोकियो पॅरालिम्पिकच्या अखेरच्या दिवशीही भारताने आपले वर्चस्व राखले. पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथिराजने रजतपदक जिंकल्यानंतर कृष्णा नागर या भारताच्या पॅरा बॅडमिंटनपटूने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला.
यासह भारताच्या नावावर तब्बल 19 पदके जमा झाली असून स्पर्धेच्या इतिहासातील भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
भारताच्या नावावर आता 5 सुवर्ण, 8 रजत आणि 6 ब्रॉंझ पदकांसह मिळून एकूण 19 पदके जमा झाली आहेत.
कृष्णा नागरने अंतिम लढतीत हॉंगकॉंगच्या शू मान कायशीचा परभव करत सुवर्णपदक मिळवले. याआधी विश्वविजेत्या प्रमोद भगतने यंदाच्या पॅरालिम्पिकमधील पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल-3 गटात सुवर्णपदक जिंकले होते.





