KP Sharma Oli Arrested: नेपाळच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. नव्याने पंतप्रधानपदाची शपथ घेतलेल्या बालेन शाह यांनी अवघ्या २४ तासांत कठोर पाऊल उचलत माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे नेपाळच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ही कारवाई ‘जेन-जी आंदोलन’ दरम्यान झालेल्या हिंसाचाराशी संबंधित आहे. या आंदोलनात झालेल्या गंभीर घटनांबाबत ओली आणि लेखक यांच्यावर निष्काळजीपणा आणि जबाबदारी न पाळल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी ठरल्यास त्यांना १५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी गौरीबहादूर कार्की यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आला होता. या आयोगाच्या अहवालात ८ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेत प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत, असे नमूद करण्यात आले. विशेषतः आंदोलकांच्या मृत्यूसाठी वरिष्ठ नेत्यांची भूमिका जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे. KP Sharma Oli Arrested kp sharma oli balen shah या हिंसाचारात एकूण ७७ लोकांचा मृत्यू झाला होता, तर मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले. अंदाजे ८५ अब्ज नेपाळी रुपयांची हानी झाल्याचेही समोर आले आहे. याशिवाय, आंदोलकांवर कठोर कारवाईचे आदेश देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले गेले आहे. दरम्यान, केपी शर्मा ओली यांनी या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी हे सर्व राजकीय सूडबुद्धीने केले जात असल्याचा आरोप केला असून, या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या बचावात सांगितले की, आंदोलनादरम्यान त्यांनी सुरक्षायंत्रणेला जीवित आणि मालमत्तेचे नुकसान कमी करण्याचे निर्देश दिले होते. KP Sharma Oli Arrested दुसरीकडे, पंतप्रधान बालेन शाह यांनी आयोगाच्या शिफारशींवर आधारित ही कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे. ‘जेन-जी आंदोलन’शी त्यांचा जवळचा संबंध असल्याचे मानले जाते आणि या आंदोलनातील पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कठोर पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे नेपाळच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या सरकारचा कडक आणि निर्णायक दृष्टिकोन यामुळे स्पष्ट झाला असून, पुढील काळात आणखी मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. KP Sharma Oli Arrested