Koynanagar: कोयनेचा पाणीसाठा 72 टीएमसीवर
Koynanagar पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने धरणात येणार्या पाण्याची आवक वाढली आहे. सध्या धरणात 32,011 क्युसेक (सुमारे 1.04 टीएमसी) एवढी आवक सुरू आहे. आज कोयना येथे 45 मिमी, नवजा येथे 8 मिमी तर महाबळेश्वर येथे 21 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Koynanagar: कोयना धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून धरणाच्या सहा वक्र दरवाज्याला पाणी टेकले आहे. पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसाने धरणातील पाणीसाठा सुमारे 72 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.
धरणाची पाणीपातळी 2132 फूट 01 इंच (649.859 मीटर) इतकी झाली असून एकूण पाणीसाठा 71.92 टीएमसी (68.33 टक्के) आहे. जिवंत साठा 66.80 टीएमसी (66.71 टक्के) इतका नोंदवण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने धरणात येणार्या पाण्याची आवक वाढली आहे. सध्या धरणात 32,011 क्युसेक (सुमारे 1.04 टीएमसी) एवढी आवक सुरू आहे. आज कोयना येथे 45 मिमी, नवजा येथे 8 मिमी तर महाबळेश्वर येथे 21 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
साधारणपणे 73.50 टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर धरणाच्या सहा वक्र दरवाज्याला पाणी लागते. मात्र, सध्याच्या वाढत्या आवक आणि पाण्याच्या दाबामुळे दरवाज्याला पाणी टेकल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, पावसाची अनियमितता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने पुढील आठवड्यात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यालाच प्रशासनाने प्राधान्यक्रम दिला आहे.
धरणात येणारी आवक समाधानकारक आहे. पावसाची अनियमितता असली तरी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरेल, असा विश्वास आहे. सध्या पाणी सोडण्याचे कोणतेही नियोजन नसल्याचे सातारा सिंचन मंडळ व कोयना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर यांनी सांगितले. दरम्यान, धरणातील वाढता साठा लक्षात घेता प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.





