Koyna Dam : कोयना धरण 75 टीएमसीच्या उंबरठ्यावर; 22 दिवसांत तब्बल 58 टीएमसीने वाढला साठा!
पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील (Koyna Dam) पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, धरण ७५ टीएमसीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ७४.८९ टीएमसी इतका झाला आहे.

Koyna Dam : पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील (Koyna Dam) पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, धरण ७५ टीएमसीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ७४.८९ टीएमसी इतका झाला आहे.
धरणाची (Koyna Dam) पाणीपातळी २१३५ फूट ०१ इंच इतकी नोंदली गेली असून, धरण सुमारे ७० टक्के भरले आहे. उपयुक्त (लाईव्ह) साठा लक्षणीय वाढला असून, सध्या धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.
धरणातील पाणीसाठा (Koyna Dam) वाढून तो धरणाच्या सहा वक्र दरवाज्यांना टेकला असून, धरणाची गेट लेव्हल झाली आहे. सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी सुमारे ३० टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात सध्या तरी पावसाचा जोर कायम असल्याने साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, त्याचा थेट परिणाम धरणातील साठ्यावर दिसून येत आहे. कोयना येथे ४२ मि.मी., नवजा येथे २८ मि.मी. पावसाची दैनिक नोंद झाली आहे. एकूण पावसाचे प्रमाण कोयना येथे २४४५ मि.मी., नवजा येथे २६७७ मि.मी. तर महाबळेश्वर येथे ३०३९ मि.मी. इतके झाले आहे.
३ जुलैपासून पावसाने जोर धरल्यानंतर धरणातील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. ३ जुलै रोजी धरणातील पाणीसाठा केवळ १६.०३ टीएमसी होता. मात्र अवघ्या २२ दिवसांत साठ्यात तब्बल ५८ टीएमसीहून अधिक वाढ झाली आहे.
सध्याच्या परिस्थितीत पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच धरण (Koyna Dam) पूर्ण क्षमतेकडे झेपावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.






