भोर विधानसभा मतदार संघासाठी मुख्यमंत्र्यांचे अश्वासन
भोर- उपजिल्हा रुग्णालय भोर येथे व्हेंन्टिलेटरसह कोविड केअर सेंटर उभारून तातडीने उपचार करणेबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे मागणी करून भोर विधानसभा मतदार संघातील अनेक प्रश्न आमदार संग्राम थोपटे यांनी मांडले. यावर सकारात्मक चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना दिल्या.
करोना संसर्गजन्य रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील करोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हातील सर्व खासदार व आमदार उपस्थित होते.
या बैठकीच्या अनुषंगाने भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे भोर विधानसभा मतदार संघातील प्रश्न मांडले व त्यावर मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी सकारात्मक चर्चा करून संबंधित विभागास तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये भोर उपजिल्हा रुग्णालय भोर येथे कोविड केअर सेंटरची उभारणी करून त्या ठिकाणी (डीसीएफसी) ऑक्सिजनसह करोना रुग्णांवर तातडीने उपचार करण्जाबाबत सूचना देण्यात आल्या. नसरापूर येथील सिध्दी विनायक हॉस्पिटल येथे करोना रुग्णाना उपचार मिळावेत यासाठी सूचना दिली.
सिम्बॉसिस हॉस्पिटल, मुळशी येथे 500 बेडची सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी भोर-वेल्हा-मुळशीतील रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअतंर्गत उपचार करण्यात यावेत व बिलात सुट देण्यात यावी, आदी सुचना करून मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथील विप्रो हॉस्पिटल येथे पुरेसा डॉक्टर आणि इतर स्टाफ उपलब्ध नसल्याने तेथे तातडीने डॉक्टर व स्टाफ नेमण्यात यावेत, या आमदार संग्राम थोपटे यांच्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला.