कोपरगाव (प्रतिनिधी) – स्वस्तात सिमेंट व स्टिल घ्या. स्टील सिमेंट नको असेल तर रोख रक्कम गुंतवा गुंतवलेल्या पैशांचा अवघ्या काही महीन्यात दाम दुप्पट परतावा देण्याचे आमिष देवुन कर्नाटक व महाराष्ट्रातील शेकडो नागरीकांची आर्थीक फसवणूक केली विशेषतः कोपरगाव तालुक्यातील सर्वाधिक नागरीकांना कोट्यावधी रुपयांना चुना लावुन फरार असलेला मुख्य सुत्रधार शिवानंद कुंभार हा गेल्या वर्षभरापासून फरार होता. अखेर बेळगावच्या पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये बाबासाहेब मच्छिंद्र गोसावी यांनी शिवानंद कुंभार याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली होती त्यानुसार कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात ३ लाख २४ हजार रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल असल्याने शिवानंद कुंभार याला या प्रकरणातील तपासासाठी बेळगाव पोलीसांकडून शनिवारी कोपरगाव पोलीसांनी त्याला ताब्यात घेवुन कोपरगाव न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने ५ जुलै पर्यंत तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिवानंद कुंभार याला राज्यात सर्वप्रथम कोपरगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे शिवानंद कुंभार यांच्यावर विविध ठिकाणी आर्थीक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, विभागिय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे,
पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे, गणेश मैड, गोपिनाथ कांदळकर, महेश फड, यमनाजी सुंबे, यांच्या पथकाने शिवानंद कुंभार याला कर्नाटक पोलीसांकडून ताब्यात घेवुन पुढील तपास करीत आहेत.
बेळगाव पोलीस स्टेशनमध्ये ७० लाख रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा एका व्यक्तीने दाखल केला माञ प्रत्यक्षात त्या व्यक्तीचे ८६ कोटी देणे आहे तर कोपरगाव येथे ३लाख २४ लाख रुपयाची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल आहे पण प्रत्यक्षात २५ कोटी रुपये देणे आहे अशी कबुली शिवानंद कुंभार याने पोलीसा समक्ष दिल्याने पोलीसही आवाक झाले.
अनेकांना कोट्यावधी रूपयांचा चुना लावून पसार झालेला शिवानंद गेल्या आठ महीण्यापासुन नेपाळ येथे परिवारासह वास्तव्यास होता. जगातील सर्वात कमी खर्चाचा देश नेपाळ असल्याने तो तिथे होता. आजुनही त्याचा परिवार तिथेच आहे.