Konkona Sen Sharma : सिनेसृष्टीत अनेक कलाकार अभिनय करण्याबरोबरच दिग्दर्शक आणि लेखकही आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा. अभिनेत्रीने अनेक हिंदी चित्रपटात सहाय्यक कलाकार ते मुख्य कलाकार काम केले आहे. याबरोबरच तिने स्वतः एका चित्रपटाचे दिग्दर्शक केले असून, काही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. आता ती एक नवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबाबत अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने अपडेट दिली आहे. २०१६ मध्ये कोंकणाने “डेथ इन द गुंज” हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. तिने ‘लस्ट स्टोरीज २’ चे सह-दिग्दर्शन केले होते. तिच्या पुढील प्रोजेक्टबद्दल माहिती देताना कोंकणा म्हणाली, “हा एक कॉमेडी शो आहे. या शोसाठी मी माझ्या कॅालेजचा मित्र जयदीप सरकारसोबत लेखन करीत असून दिग्दर्शनही करणार आहे. पण त्याबद्दल थोडी नर्व्हस असल्याचे ती म्हणाली. नुकत्याच एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत सांगितले. कोंकणा सेन शर्माला विचारण्यात आले की, ती स्वतः दिग्दर्शित केलेल्या शोमध्ये काम करेल का? यावर ती म्हणाली, “मला वाटत नाही की मी एक अभिनेत्री म्हणून यावर काम करेन. माझ्याकडे इतरही बरेच चांगले कलाकार आहेत.” मग मी स्वतःसाठी गोष्टी का कठीण करू, असे तिने स्पष्ट केले. कोंकणा सेन शर्माने “पेज ३” या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती अलीकडेच २००७ च्या “लाइफ इन अ मेट्रो” या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या “मेट्रो… दिस डेज” मध्ये दिसली होती. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, सारा अली खान, अली फजल, फातिमा सना शेख, अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. हेही वाचा : Accident News : ताम्हिणी घाटात भीषण अपघात; थार दरीत कोसळून ४ जणांचा मृत्यू