कोंढवा दुर्घटना : आगरवाल बंधूची रवानगी न्यायालयीन कोठडीत 

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – कोंढवा भागातील अल्कॉन स्टायलस सोसायटीची सीमाभिंत बांधकाम मजुरांच्या वसाहतीवर (लेबर कॅम्प) कोसळून 15 जण ठार झाल्याच्या दुर्घटनेस जबाबदार असल्या प्रकरणात अटक केलेल्या बांधकाम व्यावसायिक बंधूची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांनी हा आदेश दिला आहे.

विवेक सुनील आगरवाल (वय 32) आणि विपुल सुनील आगरवाल (वय 30 दोघे रा. क्‍लोव्हर हिल्स, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) अशी पोलीस कोठडीत वाढ झालेल्या बांधकाम व्यावसायिक बंधूंची नावे आहेत. या प्रकरणी ऍल्कॉन लॅंडमार्कस्चे भागीदार जगदीशप्रसाद तिलकचंद आगरवाल (वय 64), सचिन जगदीशप्रसाद आगरवाल (वय 34), राजेश जगदीशप्रसाद आगरवाल (वय 27), तसेच कांचन हाउसिंग बांधकाम कंपनीचे भागीदार पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्‍मीकांत गांधी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उपनिरीक्षक सागर काळे यांनी फिर्याद दिली आहे. आगरवाल बंधूंना दोनदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली

Leave A Reply

Your email address will not be published.