कोलते पाटील डेव्हलपर्सचा नफादायक ताळेबंद
Updated On:

मुंबई – कोलते पाटील डेव्हलपर्स या पुणे स्थित कंपनीला चौथ्या तिमाहीत झालेला नफा वाढून 66 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत कंपनीला 26 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते.
या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल वाढवून 723 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीचा महसूल 527 कोटी रुपये होता. सरलेल्या पूर्ण वर्षांमध्ये कंपनीचा नफा वाढून 109 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या कंपनीला 67 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या कंपनीने पुणे, मुंबई, बंगळुरू येथे 68 प्रकल्पात 30 दशलक्ष वर्ग फुटाचे बांधकाम केले आहे.




