IPL 2024 (#RCBvsKKR Match 10) : ‘सुनील नरेन’च्या नावावर मोठा विक्रम, रोहित-धोनी अन् कोहलीही ‘हे’ करू शकले नाहीत…

RCB vs KKR Indian Premier League 2024, Sunil Narine : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात गुरुवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल 2024 चा 10 वा सामना खेळला जात आहे. केकेआरचा स्टार अष्टपैलू सुनील नरेनने ( Sunil Narine ) या सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे.
आजच्या सामन्यात त्याने 500 वा टी-20 सामना खेळण्याचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो आणि शोएब मलिक यांच्या नावावर होता.
The greatest there was, the greatest there is, the greatest there ever will be…GOAT-RINE! 🐐👑 pic.twitter.com/7sj8PYEVgD
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 29, 2024
सुनीलच्या नावावर मोठा विक्रम…
कोलकाताचा स्टार फिरकी गोलंदाज सुनील नरेनने मैदानात उतरताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो आरसीबी (RCB) विरुद्ध त्याच्या T20 कारकिर्दीतील 500 वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. याआधी पोलार्डने 660 सामने खेळले आहेत. ड्वेन ब्राव्होने 573 सामने खेळले आहेत तर शोएब मलिक 542 सामने खेळून या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2008-2024-top-10-batsmen-to-score-fastest-fifties-in-ipl-history-check-list/
वेस्ट इंडिजच्या स्टार स्पिनरने 499 सामन्यात( चालू सामन्यापूर्वी) 536 विकेट घेतल्या आहेत. तर ड्वेन ब्राव्होने 625 विकेट्स घेऊन या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. याशिवाय राशिद खानने 566 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमधील 35 वर्षीय सुनील नरेनची कामगिरी पाहिली तर त्याने 163 सामने खेळले आहेत. यामध्ये सुनीलने 6.72 च्या इकॉनॉमीसह 164 विकेट घेतल्या आहेत. त्याने फलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर 1 हजार 048 धावा आहेत.





